किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास अटक

On: March 7, 2024 8:21 PM

जळगाव : किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय संजय कोळी (रा. इंदीरानगर प्लॉट भाग अडावद ता. चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सावदा आणि चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे अटकेतील अक्षय कोळी याने कबुल केले असून ते उघडकीस आले आहेत.

अक्षय कोळी याच्याकडून चोरीच्या 4248 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ. संदीप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचंद्र बागुल, गोरखनाथ रामभाऊ बागुल आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment