उल्हासनगरात खंडणीखोरांची टोळी अटकेत

On: August 29, 2020 7:21 PM

उल्हासनगर : जीन्स व्यापारी सनी अनवानी यांचे मागील आठवड्यात पिस्तुल व चाकूच्या धाकावर अपहरण करण्यात आले होते. सनी अनवाणी याच्या वडिलांकडे १० लाखाची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागीतली होती. या खंडणीखोर चौकडीला आज हिललाईंन पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून अजून काही गुन्हयांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या टोळीला चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment