हद्दपार आरोपीस सु-यासह अटक

On: March 9, 2024 9:52 PM

जळगाव : एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने हद्दपार आरोपीस लोखंडी सु-यासह अटक केली आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव) असे दोन वर्षासाठी हद्दपार करण्यांत आलेल्या अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आशुतोष मोरे हा मेहरुण तलाव परिसरात शस्त्रासह भ्रमण करत असल्याची माहिती पो.नि. बबन आव्हाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, सचिन पाटील राहुल रगडे, विशाल कोळी, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी त्यास शिताफीने जेरबंद केले. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुंबई पोलीस कायदा कलम कायद्यासह आर्म एक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment