जळगावला आग – फर्निचर दुकान भक्ष्यस्थानी

On: March 10, 2024 8:57 AM

जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव शहरातून जाणा-या  महामार्गालगत शिव कॉलनी परिसरात फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या आगीत फर्निचर दुकानासह हॉटेल आणि गॅरेजचे नुकसान झाले आहे.

शिव कॉलनी नजीक महामार्गालगत हॉटेल बावर्ची असून त्याशेजारीच एक फर्निचरचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार फर्निचर दुकानाला आज सकाळी सव्वा सात  वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागण्यामागचे नेमके कारण पुढे आले  नसले तरी  या घटनेत फर्निचर दुकानासह हॉटेल बावर्ची आणि गॅरेज देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच फायर फायटरच्या वाहनांनी घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवले.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment