चोरीच्या मोटारसायकलीसह चोरट्यास अटक

On: March 11, 2024 3:38 PM

जळगाव : मोटार सायकल चोरट्यास चोरीच्या मोटार सायकलसह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. इमरान अयोद्दीन पिंजारी (रा. अनरद ता. शहादा जि. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोरट्याचे नाव आहे. दिलीप भगवान कोळी यांच्या मालकीची मोटारसायकल त्यांच्या राहत्या घरासमोरुन मेहरुण परिसरातून चोरी झाली होती.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात इमरान पिंजारी यास सारंगखेडा येथून चोरीच्या मोटारसायकलीसह अटक करण्यात आले  आहे. पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करत आहेत. या तपासकामी सारंगखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक किरण वारे यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment