सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल अथवा डिझेलच्या दरात काहीही बदल करण्यात आलेला नाही. असे असले तरी आज पुन्हा पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 82 रुपयांच्या पुढे गेले आहे, दिल्लीत पेट्रोल 82.03 रुपये व डिझेल 73.56 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.16 ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत पेट्रोल 14 पैशांनी महागले होते. त्यानंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.60 रुपयांनी वाढले.
जुलै महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी केवळ डिझेलचे दर वाढवले होते. त्यावेळी डिझेलच्या दरात 10 हप्त्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. डिझेल प्रतिलिटर 1.60 रुपयांनी वाढले होते. या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहिली असता सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस वगळता किमतीत वाढ केलेली नाही. जुलै महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात देखील पेट्रोलचे दर कायम होते. डीझेलचे दर सलग चार दिवस (28 जुलै ते 31 जुलै) पर्यंत स्थिर होते.