दहशत माजवणा-यास सु-यासह अटक

On: March 13, 2024 10:54 AM

जळगाव : हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजवत फिरणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने खेडी बस स्थानक परिसरातून अटक केली आहे. कमलेश प्रकाश सपकाळे (रा. हरीओम नगर जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव  आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्यापथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना विकास सातदिवे, नितीन ठाकुर, मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, विजय कोळी, साईनाथ मुंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment