गांजाची लागवड करणा-यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक

On: March 13, 2024 8:09 PM

जळगाव : गांजाची लागवड करणा-यास सुमारे 980 किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. 44 लाख 10 हजार रुपयांची गांजाची हिरवी ओली  झाडे या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला अर्जुन सुमाऱ्या पावरा (रा. मेलाणे ता. चोपडा) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

शासनाकडून उप जिविकेसाठी मिळालेल्या शेतजमीनीवर अर्जुन पावरा याने गांजाची शेती केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. अमोल मोरे, सफौ युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, पोना अशोक पाटील, पोकॉ बबन पाटील, मपोहेकॉ रजनी माळी, मपोना उपाली खरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास स.पो.नि. नितनवरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment