नऊ लाखांच्या गुटख्यासह एकास अटक

On: March 14, 2024 6:45 PM

जळगाव : मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्यासह विविध पानमसाला व तंबाखूचा साठा चाळीसगाव शहर  पोलिसांनी जप्त केला आहे. 9 लाख 24 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अक्षय गुलाब कोतकर (रा. गुरुवर्य नगर, तिरंगा पुलाजवळ, चाळीसगांव) या तरुणास अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातील वाहन तपासकामी जप्त करण्यात आले आहे.

चाळीसगांव शहरातील तिरंगा पुलावरुन अवैधरित्या प्रतिबंधीत विमल गुटखा विक्रीच्या उद्देशाने एका वाहनातून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोना भुषण पाटील, भटु पाटील, पोकॉ मनोज चव्हाण आदींचे पथक घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान वाहन तपासणीदरम्यान 13 मार्चच्या रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास एमएच 19 इए  3978 या क्रमांकाचे संशयीत चारचाकी वाहन अडवण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा, पान मसाला व तंबाखू आदींच्या 18  गोण्या आढळून आल्या.  अक्षय कोतकर याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 112/24 भा.द.वि.कलम 328, 188, 272, 273 सह अन्न व सुरक्षा अधिनियम मानके 2006 चे कलम 26 (2) (iv), 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment