सेल्फीच्या नादात दोघा भावांना जलसमाधी

On: August 30, 2020 1:43 PM

भिंवडी : भिवंडीतील कामवारी नदीत मासेमारी करण्यासाठी दोघे भाऊ गेले होते. मासेमारी करता करता दोघांना आपल्या मोबाइलमधे सेल्फी घेण्याचा मोह झाला. सेल्फी घेण्याच्या मोहात आणी नादात दोघांना जलसमाधी मिळाल्याची घटना घडली.बुडालेल्या दोघा भावांचे शव शोधण्याकामी अग्निशमक दलाला अखेर यश आले आहे.

मासेमारी करता करता सेल्फी काढताना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. शहबाज अन्सारी (24) आणि शाह आलम अन्सारी (22) अशी दोघा मयत भावांची नावे आहेत.मासेमारी करतांना दोघांची आई त्यांच्या सोबत होती. भावाला बुडतांना पाहून दुस-या भावाने देखील पाण्यत उडी घेतली. मात्र दुसरा भाऊ देखील पाण्यात बुडून मरण पावला. त्यावेळी दोघांच्या आईने जिवाचा आकांत केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment