अट्टल चोरट्यास चोरीच्या मोटरसायकलसह अटक

On: March 22, 2024 8:55 PM

जळगाव : चोरी घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला चोरीच्या मोटरसायकलसह चोपडा येथून अटक करण्यात आली आहे.   सुनिल उर्फ लंबू अमरसिंग बारेला (रा. गौ-यापाडा ता. चोपड़ा जि. जळगांव) असे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. 

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिल उर्फ लंबू बारेला हा चोपडा शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोहेकॉ संदीप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचंद्र बागुल, सचिन चौधरी, चालक महेश सोमवंशी आदींनी चोपडा गाठत फरार सुनील यास ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment