नवी दिल्ली : भारतात डिजिटल बँकिंग सेवा सुरू करण्यास व्हॉट्सअॅप इच्छुक आहे. 22 जुलै रोजी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात भारतातील डीजीटल बॅंकींग सेवेचा प्लॅन स्पष्ट करण्यात आला. व्हॉट्सअॅपचे भारतातील प्रमुख अभिजीत बोस यांनी म्हटले आहे की यूपीआयावर आधारीत सेवांप्रमाणेच या सेवेची सुरुवात होईल. भारतात फायनांशिअल सेवांसह बँकांच्या डिजिटल सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हा व्हॉट्सअॅपचा मुख्य उद्देश्य आहे.
भारतात चाळीस कोटी लोक व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअॅपला पैशांच्या देवाणघेवाणीची सेवा सुरू करण्यासाठी मोदी सरकारची परवानगी लागणार आहे. व्हॉट्सअॅपवर भाजपाची मोठी पकड असल्याचे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी व्हॉट्सअॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅनचा उल्लेख अनेक वेळा केला आहे.
व्हॉट्सअॅप बँका आणि इतर फायनांशिअल सेवा पुरवठादारांच्या सोबतीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी तिन विशेष सुविधा देण्याची योजना तयार केली जात आहे. पहिल्या सेवेत पेन्शन, दुसऱ्या सेवेत विमा तसेच तिसऱ्या सेवेत मायक्रो लोनचा समावेश राहणार आहे.