सोलापुरात काळवीटाची शिकार – आरोपी अटकेत

On: August 30, 2020 4:11 PM

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात काळवीटाची शिकार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शिकार करण्यात आलेल्या काळविटाचे मांस विक्री करतांना आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्या सदस्यांनी या बाबत वनविभागासह ग्रामीण पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे वनविभागासह ग्रामीण पोलिसांनी या कारवाईला आकार दिला.

विजय भोसले असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याने यापुर्वी देखील असे कित्येक काळवीट व वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे समजते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी या ठिकाणी हा गुन्हयाचा प्रकार घडला. या कारवाईसाठी पोलिस अधिक्षकांनी पोलिसांचे एक पथक नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोबत पाठवले. वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेतल्यानतर घटनास्थळी गेल्यावर हा प्रकर उघड झाला. वन्य शिकारीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment