इराणी सोनसाखळी चोरांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

On: April 5, 2024 8:10 AM

जळगाव : सोनसाखळी चोरीचा गुन्हा करुन पसार झालेल्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशात जाऊन अटक केली. मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील जुलवाणीया येथील इराणी वस्तीत

सलग दोन त्यांच्या पाळतीवर राहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेले दोघे चोरटे नंदुरबार जिल्हातील नवापुर पोलीस स्टेशनच्या एका गुन्हांत, उपनगर पोलीस स्टेशनच्या दोन, नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या दोन अशा एकुण पाच गुन्हात फरार होते आणि ते पोलिसांच्या दृष्टीने वाँटेड होते. 

जळगाव येथील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार या जेष्ठ नागरिक असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत मोटारसायकल वर आलेल्या  चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, पोकों राजश्री बाविस्कर आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment