जळगाव : पेट्रोल पंपावरील हिशेबाची रक्कम घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव तालुक्यातील तो रहात असलेल्या सुभाष वाडी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. योगेश काळु राठोड असे त्याचे नाव आहे.
शिरसोली रस्त्यावरील इशाणी पेट्रोल पंपावर योगेश राठोड कामाला होता. 8 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत कामावर असतांना पेट्रोल पंपावरील हिशेबाची 1 लाख 2 हजार 709 एवढी रक्कम घेऊन तो पसार झाला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला अपहाराचा गुन्हा मॅनेजर रविंद्र आधार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार नोंद झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश काळु राठोड याचा शोध सुरु होता. दरम्यांन 3 एप्रिल रोजी तो सुभाषवाडी येथे आला होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. न्या.वसीम देशमुख यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षाच्या वतीने याप्रकरणी अँड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, पोहेकॉ समाधान टहाकळे, शुध्दोधन ढवळे, साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.