तरुणीचे अपहरण करुन चौघांचा अत्याचार

On: April 6, 2024 12:47 PM

जळगाव :  जामनेर तालुक्यातील वीस वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांमधे सीमा सुरक्षा बलातील एका जवानाचाही समावेश आहे. या घटनेने जामनेर तालुक्यात खळबळ माजली आहे.

पीडित वीस वर्षीय तरुणीचे मार्च 2023 ते 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अपहरण करण्यात आले होते. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सहा महिन्यांनी उघडकीस आली. याप्रकरणात स्वतः तरुणी समोर आली आहे. 

सुदाम संभाजी कोळी, राहुल सुनील चौधरी, सतीश रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण व गणेश सोनवणे हे या घटनेतील संशयित आरोपी असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश संजय सोनवणे (रा. टेकनपूर, जि. ग्वाल्हेर) हा बीएसएफमध्ये जवान आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment