दोन महिने लटकला होता मृतदेह

सोलापूर : लॉकडाऊन काळापासून बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलमधे एका कामगाराने गळफास घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्या कामगाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेतच होता. सोलापूर – पुणे रस्त्यावर मोहोळ शहरानजीक एका बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलमधे हा प्रकार नुकताच उघडकीस आला.लॉकडाऊन काळात आत्महत्या करणा-या हॉटेल कामगाराची गावाकडे जाण्याची व जेवणाची देखील सोय झाली नाही. त्यामुळे बंद अवस्थेतील हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत या कामगाराने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

गेल्या दोन ते अडीच महिन्यापासुन त्याचा मृतदेह लटकत राहिला. त्यामुळे त्याची मान गळून बाजुला पडल्याचे घटनास्थळी दिसून आले.सोलापूर जिल्हयाच्या मोहोळ शहरानजीक असलेल्या कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रुची हे लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे बंद होते. हॉटेलच्या मूळ मालकाने हॉटेल रुची हे दोघांना चालवण्यास दिले होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद अवस्थेत होते. हॉटेलात काम करणारे तिघे जण परप्रांतीय होते. त्यातील दोघांना गावी जाण्याचा पास मिळाला मात्र याला मिळाला नाही. त्यामुळे हा हॉटेलमधेच राहिला.

लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला मिळेल त्या जेवनावर त्याने कसेबसे दिवस काढले होते. त्यानंतर त्याची सर्वच गैरसोय होत गेली. अखेर जिवनाला कंटाळून त्याने हॉटेलच्या किचनमधेच छताच्या अँगलला साडी बांधुन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आज सकाळी 30 ऑगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाच्या जवळ असलेल्या कागदपत्रावरुन त्याचे नाव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे निष्पन्न झाले. तो मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here