शव अदलाबदली – नाशिकचे भोपाळकडे ; भोपाळचे नाशिकला

On: August 30, 2020 6:47 PM

नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील दोघा मृतदेहांचे शवविच्छेदन आटोपल्यानंतर ते संबंधीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी ओळख पटवून रुग्णालय प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले मात्र घाईगर्दीत मृतदेहांची अदलाबदली झाली. नाशिकचा मृतदेह भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृतदेह नाशिककर नातेवाईकांच्या ताब्यात आला. या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाची कुठलीही चुक नसल्याचे स्पष्टीकरण देत ही चुक नातेवाईकांचे असल्याचे म्ह्टले आहे.

गेल्या शनिवारी संध्याकाळच्या वेळी नाशिक शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. दोन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता घेतांना ही गफलत झाली. नाशिककर कुटुंबीय मृतदेह अंत्यसंस्काराला घेवून जात असतांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत माहिती दिली.
नाशिककर कुटुंबीयांनी भोपाळच्या दिशेने गेलेल्या रुग्णवाहिकेतील नातेवाईकांशी संपर्क साधत प्रकार कथन केला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन्ही शोकमग्न परिवारातील सदस्यांनी आपापल्या शवाची पाहणी करुन खात्री करत मृतदेह ताब्यात घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment