आसोदा येथील इसम बेपत्ता

On: April 13, 2024 3:18 PM

जळगाव : जळगाव तालुक्यातील आसोदा येथील इसम गेल्या बारा वर्षापासून बेपत्ता झाला आहे. हुकुमचंद सिताराम गवळी असे एक तपापासून बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांची पत्नी गिताबाई गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

हुकुमचंद गवळी हे 15 जानेवारी 2012 रोजी सकाळी नऊ वाजता घरातून कामावर जात असल्याचे सांगून बाहेर गेले होते. मात्र अद्यापही ते परत आलेले नाही. नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला मात्र ते कुठेही सापडले नाही व त्यांचा शोध लागला नाही. हुकूमचंद गवळी यांच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment