पंधरा हजाराच्या लाचेत अडकली ग्रामसेविका

On: April 15, 2024 7:21 PM

धुळे : ठेकेदाराचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात 15 हजाराची लाच घेतांना धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील मौजे चौगाव येथील ग्रामसेविका राजबाई पाटील या एसीबीच्या सापळ्यात सापडल्या. त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम केले आहे. त्या कामाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. याबाबत तक्रारदाराने सुमारे एक महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेत बिल अदा करण्याची विनंती केली होती. मात्र यापूर्वी अदा केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिलाच्या मोबदल्यात 25 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबी धुळे कार्यालयाकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती 15 हजार घेतांना ग्रामसेविका राजबाई पाटील रंगेहाथ एसीबी पथकाच्या हाती लागल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment