जळगावात सोळा वर्षाच्या मुलीची आत्महत्या

On: August 30, 2020 8:15 PM

जळगाव : जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रामेश्वर कॉलनी भागातील सोळा वर्षाच्या मुलीने मध्यरात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.योगीता लिलाधर जयकर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून तिने आत्महत्या का केली याचा खुलासा होवू शकला नाही.

स्वामी समर्थ मंदीराजवळ परिवारासमवेत राहणारी योगिता लिलाधर जयकर ही शनीवारी मध्यरात्री घराशेजारी असलेल्या एका रिकाम्या खोलीत आली होती. त्याठिकाणी तिने दोरीच्या मदतीने छताला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी तिच्या कुटूंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तिला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment