जळगाव : रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत राजीव गांधी नगर येथील हातभट्टीची दारू विकणाऱ्या महिलेविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. छायाबाई रमेश सकट असे कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून राजीव गांधी नगर परिसरात हातभट्टीची दारू विक्री सुरु असल्यामुळे या भागातील तरुण व्यसनाधीन झाले होते.
छायाबाई सकट या महिलेविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाया करून देखील या महिलेच्या वर्तणूकीत कोणताही बदल झाला नाही. तीचा हातभट्टी दारु विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. त्यामुळे या परिसरातील स्त्रिया व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले होते. या महिलेची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला येथे करण्यात आली आहे.
सदर कारवाईकामी प्रामुख्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, स.पो.नि. विठ्ठल पाटील, पोहेकॉ. संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशील चौधरी, इरफान मलिक, उषा सोनवणे, सुनिल दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा), पो.ना. रेवानंद साळुंखे, पोना हेमंत कळसकर, पोना विनोद सूर्यवंशी, पोकॉ रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, किरण पाटील, मनोज मराठे, पो.कॉ. ईश्वर पाटील (स्थागुशा) आदिंनी याप्रकरणी कागदपत्रांची पुर्तता केली. पोलीस उप निरीक्षक कैलास दामोदर यांच्यासह पो.कॉ.अनिल सोनोनी, महिला कर्मचारी अर्चना घुणावत व शिला गांगुर्डे आदींच्या पथकाने महिलेची कारागृहात रवानगी केली.