पुणे : समलैंगिक संबंध ठेवण्याच्या मोहापायी गेलेल्या विवाहित तरुणाला मारहाण करत त्याच्या ताब्यातील ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्टेशनला चौघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.धायरी येथील डीएसके विश्व ते नांदेड फाटा दरम्यान ९ ऑगस्ट रोजी एका खोलीत हा प्रकार घडला होता. बदनामी व संसार मोडला जाईल या भितीपोटी या घटनेची तरुणाने कुठेही वाच्यता केली नाही. त्याने हा प्रकार जवळच्या काही मित्रांना सांगितला. मित्रांनी त्याला धिर देत पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. तरुणाने सिंहगड रोड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.
फिर्यादी हा एका गे साठींच्या अॅपवर चॅटिंग करत होता. पलीकडून त्याला रवी नावाच्या एकाने हाय असा मेसेज पाठविला़ होता. पिडीत फिर्यादी तरुणाने त्याला कुठे आहे असा प्रश्न केला. त्यावर त्याला पलीक्डून डीएसके रोड असे सांगण्यात आले. या ठिकाणी एक जागा आहे असे त्याला पुढे सांगण्यात आले. फिर्यादी त्याठिकाणी गेला़ असता त्याला रवी नावाचा तरुण भेटला. दोघे जण सोबत असताना त्याठिकाणी चौघेजण तलवार, काठ्या घेऊन खोलीत शिरले़. त्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण करत तलावारीचा धाक दाखवला. त्याच्या या कृत्याचा व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी दिली. फिर्यादीजवळ असलेले दहा हजार रुपये रोख व शिवाय सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या बळजबरी काढून घेण्यात आल्या. त्याच्या ताब्यातील एटीएमचा पीन घेवून गुगल पे द्वारे पैसे काढून घेण्यात आले. गे अॅपच्या माध्यमातून कट रचून लुटीचा हा प्रकार दिसून येत आहे.





