स्वस्त गृहकर्ज आणि कमी झालेले मुद्रांक शुल्क

On: August 31, 2020 9:52 AM

मुंबई : राज्य सरकारने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, सर्वात कमी व्याज दरातील गृह कर्ज घर खरेदीची सर्वोत्तम संधी उपलब्ध झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु केलेले लॉकडाऊन नुकसानदायक ठरले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली. घरांच्या खरेदी विक्रीवर देखील त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य शासनाचा निर्णय ग्राहकांसोबतच विकासकाला देखील फायदेशीर आचे.

ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्या बांधकामांना वापर परवाना मिळाला आहे, त्या घरांना खरेदीसाठी जीएसटी लागत नाही. त्यामुळे रेडी टू मुव्ह गटातली घरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाण्याचा एक मतप्रवाह असल्याचे म्हटले जात आहे.डिसेंबर अखेर घरांचे व्यवहार पुर्ण केल्यास मुद्रांक शुल्कात तीन टक्के व डिसेंबर ते मार्च पर्यंत गृह खरेदी केल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. राज्य सरकारचा महसूल यामुळे कमी होणार असला तरी बांधकाम व्यवसायावर आधारीत २६९ पूरक व्यवसायांचे अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी घर खरेदी विक्रीचे व्यवहार वाढवणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment