नाशिक : त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे शिवारातील मानस लॉजींग बोर्डींगवर छापा टाकून नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने तेथे सुरु असलेला कुंटणखाना उघडकीस आणला आहे. या छापा कारवाईत दलाल किशोर निवृत्ती शिंदे, रा. खंबाळे, ता. त्रंबकेश्वर यास ताब्यात घेतले आहे. मानस लॉजींग बोर्डींगचा मालक गणेश भिका मोरे हा फरार झाला आहे.
मानस लॉजींग या ठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे 26 एप्रिलच्या दुपारी बनावट ग्राहक पाठवण्यात आला. याठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवणारा दलाल किशोर निवृत्ती शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. मात्र लॉज मालक गणेश मोरे हा फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी त्रंबकेश्वर पोलीस स्टेशनला गु.र.न. 88/24 भा.द.वि. 370, 34 तसेच सह कलम 3, 4, 45, 6 पिटा कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, हे.कॉ. नवनाथ सानप, चेतन संवत्सरकर, किशोर खराटे, सतिष जगताप, संदिप नागपुरे, पो.ना. विश्वनाथ काकड, पो.शि. कुणाल मोरे, पो.शि. नितीन जाधव, महिला पो.ना. योगीता काकड, महिला पो.शि. छाया गायकवाड, चालक सपोउनि, गोजरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.