जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरात डी-सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीत 17 एप्रिल रोजी आगीने रौद्र रुप धारण करत पाच जणांना मृत्यूच्या दारात नेले होते. या आगीच्या घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले होते. आता बुधवारी अजून एका गंभीर जखमीचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या सहा झाली आहे. चंद्रकांत लक्ष्मण पाटील (रा. किरवाडा, पो. साकळी बोराडे, जि. धुळे) असे मृत तरुण कामगाराचे नाव आहे.
मोरया केमिकल कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेत जबर जखमी कामगार चंद्रकांत हा सत्तर टक्के भाजला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. एमआयडीसी पोलिस स्टेशनला या घटने प्रकरणी मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत यापूर्वी समाधान नारायण पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा, सचिन चौधरी असे पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत.