शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

On: May 3, 2024 7:35 PM

जळगाव : चोपडा येथील प्रचार सभा आटोपून रा. कॉ. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे भुसावळ येथे मविआच्या बैठकीला येत होते. दरम्यान वाटेत किनगाव नजीक त्यांच्या ताफ्यातीन दोन वाहनांचा अपघात आज 3 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात प्राणहानी झाली नाही मात्र दोघा अपघातग्रस्त वाहनांचे नुकसान झाले आहे. 

रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज जळगाव जिल्ह्यात आले आहेत. चोपडा येथील जाहीर सभा आटोपून पवार हे आपल्या वाहनांच्या ताफ्यासह भुसावळ येथे निघाले होते. वाटेत यावल तालुक्यातील किनगाव नजीक शरद पवार यांच्या मागे असलेल्या एमएच 15 सीएम 9276 आणि एमएच 48 एस 5895 या दोन वाहनांचा अपघात झाला. या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment