हस्तगत केलेले गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत 

On: May 9, 2024 9:11 PM

जळगाव : फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या बारा मोबाईलचा शोध घेऊन ते मुळ मालक तथा तक्रारदारांना सहायक पोलिस अधीक्षक तथा डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते परत करण्यात आले. 

संबंधीत मोबाईलधारक तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासह त्या मोबाईलचा शोध घेण्याचा विषय वेळोवेळी मासीक क्राईम मिटींग दरम्यान झाला होता. 

संबंधित मोबाईल धारकांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे तांत्रीक विश्लेषण करुन सायबर शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने हस्तगत करण्यात आलेले अंदाजे एक लाख रुपये किमतीचे बारा मोबाईल सहायक पोलिस अधीक्षक तथा डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते परत करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment