अशोकभाऊ जैन यांनी सपत्नीक केले मतदान

On: May 13, 2024 2:23 PM

जळगाव : जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आज पहाटे लोकसभा मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी एम.जे. कॉलेज कॅम्पसमधील ओरियन स्कुलमधे त्यांनी मतदानाचा हा हक्क सपत्नीक येऊन बजावला. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी बोलतांना अशोकभाऊ म्हणाले की मतदान हा संविधानाने आपणा सर्वांना दिलेला हक्क आहे. तो हक्क आपण सर्वांनी बजावून आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था बळकट केली पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणा-या आपल्या देशात सुरु असलेल्या मतदानाचा आपण हक्क बजावून योग्य असा उमेदवार निवडला पाहीजे आणि त्या उमेदवाराला संसदेत पाठवले पाहीजे. त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावे असे त्यांनी समस्त मतदारांना आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment