जामनेरला सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

जळगाव : माजी क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील राहत्या घरात स्वतःवर पिस्टलच्या गोळ्या झाडून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. प्रकाश कापडे असे या आत्महत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी घरात काही महिला सदस्य होत्या असे समजते. या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. 

सुरक्षा रक्षक प्रकाश कापडे याचे शव उत्तरीय तपासणीकामी जळगावला रवाना करण्यात आले आहे. मात्र उत्तरीय तपासणी धुळे येथे केली जाणार आहे असेही म्हटले जात आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून एसआरपीएफच्या सेवेत असलेल्या प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सुरक्षारक्षकाचे काम केलं होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here