उल्लेखनीय तपास करणाऱ्या पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांकडून सन्मान

On: May 18, 2024 9:07 AM

जळगाव : जळगाव पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक शुक्रवार 17 मे रोजी संपन्न झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक एम महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे तातडीने अल्पावधीत उघडकीस आणणाऱ्या एलसीबी सह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष उल्लेख करत त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता. विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे भविष्यात देखील उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment