खूनाच्या गुन्ह्यातील दुस-या संशयितास अटक 

जळगाव : उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्याच्या कारणावरुन भडगाव पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील दुस-या  संशयीत आरोपीस अटक  करण्यात आली आहे. रोहीत दिलीप मराठे (रा. वरची पेठ, भडगाव) असे अटक करण्यात आलेल्या दुस-या संशयिताचे नाव आहे.

उसने दिलेले पैसे अश्लिल शिवीगाळ करुन वारंवार मागत असल्याच्या कारणावरुन सुपडू नाना पाटील याचा दगडाच्या खाणीत नेवून चाकूने वार करुन खून करण्यात आला होता. या घटनेतील मुख्य संशयीत आरोपी हितेश उर्फ कुणाल मराठे यास यापुर्वी अटक करण्यात आली आहे. या खूनाच्या तपासात अटकेतील दुसरा संशयीत रोहीत मराठे याने देखील आपला गुन्हा कबुल केला आहे. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी हितेश याच्या मोटारसायकलवर मयत सुपडु पाटील यास डबलसिट बसवून वरखेड गावानजीकच्या दगडाच्या खाणीत नेल्याचे रोहीतने कबुल केले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ प्रविण परदेशी, पोकॉ संदिप सोनवणे यांनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here