लाचखोर तलाठी महिलेचे लाचेने बरबटले मन – पंचविस हजाराच्या लाचेचे मागितले अधिक धन

धुळे : विट भट्टी व्यावसायीकास हव्या असलेल्या मातीच्या वाहतुकीसाठी गौण खनिज रॉयल्टीची विनापावती पंचवीस हजाराची रक्कम ठेवून घेतल्यानंतर अजून पंचवीस हजाराची रक्कम लाचेच्या स्वरुपात मागणा-या तलाठी महिलेविरुद्ध धुळे एसीबीने कायदेशीर कारवाई केली आहे. श्रीमती वर्षा काकुस्ते असे पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेल्या तलाठी महिलेचे नाव आहे.

गेल्या वर्षी सन 2023 मधे झालेल्या घटनेतील तकारदार हे मौजे शिवरे दिगर, ता. पारोळा येथील रहिवासी आहेत. त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे. विट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता होती. मातीची वाहतुक करण्यासाठी त्यांनी तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली होती. भेटी दरम्यान वर्षा काकुस्ते यांनी तक्रारदाराकडून गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याच्या  नावाखाली पावती न देता पंचविस हजारची रक्कम स्वत:कडेच ठेऊन घेतली.

त्यानंतर तकारदाराने गौण खनिज परवान्याच्या  चौकशीकामी  तलाठी वर्षा काकुस्ते यांची पुन्हा भेट घेतली असता त्यांनी अजून पंचविस हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. धुळे एसीबीने या तक्रारीची 12 डिसेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली होती. धुळे एसीबी कार्यालयाने या तक्रारीची 13 डिसेंबर 2023 रोजी पडताळणी केली असता तक्रारीची सत्यता स्पष्ट झाली. त्यामुळे पारोळा पोलिस स्टेशनला याप्रकरणी तलाठी वर्षा काकुस्ते यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here