गहाळ मोबाईल तक्रारदारांना सुपुर्द – चाळीसगांव शहर पोलिसांची कामगिरी

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले सुमारे 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे मोबाईल शोधून ते मुळ तक्रारदारांना सुपुर्द करण्यात आले. अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी अभयसिंग देशमुख यांच्या हस्ते तपासाअंती शोधलेल्या बारा मोबाईलचे वितरण करण्यात आले.

चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या वर्षापासून मोबाईल गहाळ होत असल्याच्या ब-याच तक्रारी सुरु होत्या. वरिष्ठ पाताळीवरुन याबाबत दखल घेण्यात आली. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच तक्रारदार मोबाईलधारकांनी दिलेल्या माहितीसह तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदीप भटू पाटील व त्यांच्या सहका-यांनी गहाळ झालेल्या बारा मोबाईलचा शोध लावला.

चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदीप भटु पाटील यांच्यासह पो.कॉ. शरद पाटील, नरेंद्र चौधरी, मनोज तडवी, पोलिस नाईक सचिन सोनवणे (सायबर पो.स्टे), पोना ईश्वर पाटील (स्था.गु. शाखा), गौरव पाटील (स्था.गुन्हे शाखा) आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here