डोक्यात बेसिन घालून युवकाचा खुन

On: August 31, 2020 8:47 PM

पुणे : पुणे येथील पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी सहकारी मित्राच्या डोक्यात बेसिन घालून खून केल्याची घटना घडली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.काळेवाडी परिसरातील हॉटेल खुशबू नजीक रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. मित्रांसोबत दारु प्राशन करत असतांना झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे.

या घटनेत शुभम साठे या अवघ्या विस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.शुभम साठे या खून करणा-या कृष्णा भारत कापुरे, अजय मोहन क्षीरसागर आणि ज्ञानेश सुनील थोरात अशी तिघातरुणाचा संशयीत आरोपींची नावे आहेत. आज सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment