जळगाव सराफ बाजार दरोड्यातील एकुण सहा जण अटकेत

जळगाव : जळगावच्या सराफ बाजारातील सौरभ कोठारी यांच्या मालकीच्या सौरभ ज्वेलर्स या दुकानात टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आतापर्यंत एकुण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील दरोडेखोरांकडून आतापर्यंत एकुण 4 लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रणजितसींग जिवनसींग जुन्नी, सागरसिंग जिवनसिंग जुन्नी, झेनसिंग उर्फ उर्फ लक्की जिवनसिंग जुन्नी (सर्व रा. राजीव गांधी नगर, हरीविठठल नगर, जळगाव) या तिघांना 21 मे 2024 रोजी पुणे येथून अटक करण्यात आली  आहे. त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार व तपासात निष्पन्न झालेल्या तिघांना देखील 24 मे 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. राम उर्फ सोनु भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर शनिपेठ जळगाव), रितेश संतोष आसेरी (रा. पंचमुखी हनुमान मंदीराच्या पाठीमागे रणछोडदास नगर जळगाव) आणि दिपक मक्तराज गोयर (रा. गुरुनानक गगर शनिपेठ जळगाव) अशी नंतर अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अशा प्रकारे एकुण सहा जणांना या दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

दिनांक 20 मे 2024 रोजी पहाटे साडेतीन ते सव्वा चार  वाजेच्या सुमारास जळगाव सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स या सराफी दुकानावर हा दरोडा टाकण्यात आला होता. सहा जणांनी कट रचून पुर्व तयारीनिशी दुकानाच्या मागील बाजुचे चॅनलगेटचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील दोघा कामगारांना चाकूचा धाक दाखवत दुकानातील सुमारे 25 लाख 47 हजार 574 रुपये किमतीचे 350.830  ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड/दागिने, 6 लाख 50 हजार रुपये किमतीचे 7820 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तु तसेच 32 हजार रुपये  रोख  असा  एकुण 32 लाख 29 हजार 574 रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकला होत. दरोड्यानंतर सर्वजण तिन  मोटार सायकलींवर बसून पसार होण्यात यशस्वी झाले होते.

या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न.  116/24 भा.द.वि. 395, 120 (ब), 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारा-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप विभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्यासह शनीपेठ पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपास करत होते. तपासादरम्यान  सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहीतीद्वारे दरोडयातील आरोपींपैकी रणजितसींग जिवनसींग जुन्नी, सागरसिंग जिवनसिंग जुन्नी आणि झेनसिंग उर्फ उर्फ लक्की जिवनसिंग जुन्नी अशा तिघांना पुणे येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे साथीदार राम उर्फ सोनु भगवान सारवान, रितेश संतोष आसेरी व दिपक मक्तराज गोयर अशा  तिघांना अटक करण्यात आली.

अटकेतील आरोपींकडून आतापर्यंत 2 लाख 5 हजार किमतीचे 2465 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध शिक्के, 1 लाख 72 हजार 500 रुपये किमतीचे 23 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, साडेचार हजार रुपयांची रोकड, तिन मोटार सायकली व इतर  दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल विहीरीत फेकून दिली होती. ती मोटार सायकल विहिरीतून बाहेर काढून जप्त करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह पोलिस उप विभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सायबर सेलचे पो.नि.  दत्तात्रय निकम, शनिपेठ पोलिस स्टेशनचे सपोनि विठ्ठल पाटील, पो.उप. निरी चंद्रकांत धनके, पो. उप. नि. गणेश वाघमारे, पोलीस अमंलदार सफौ. रवी  नरवाडे, संजय हिवरकर, पौहेकॉ अमोल विसपुते, विजय चौरे, प्रमोद लाडवंजारी, नितीन बाविस्कर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, संदीप पाटील, पोना किरण धनगर, अश्विन हडपे, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, योगेश साबळे, कमलेश पाटील, किरण वानखेडे, चालक इद्रीस पठाण, लोकेश गजरे, प्रमोद ठाकुर, भारत पाटील तसेच रामानंद नगर पो.स्टे. चे पोहेकॉ. सुशिल चौधरी, पोना रेवानंद साळुंखे व उमेश पवार आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो. उप निरी, चंद्रकांत धनके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here