जळगाव : उधारीच्या वादातून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी आतापर्यंत एकुण सात जणांना अटक केली आहे. 22 मे 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरातील हॉटेल भानू येथे खून झाला होता. टोळक्याकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. मयत किशोर सोनवणे याच्यावरील हल्ल्यात धारदार शस्त्रासह लाकडी काठ्या व दांडके याचा वापर झाला होता. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला भाग-5 गुरन. 119/2024 भा.द.वि. 302, 143, 145, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 22 मे 2024 च्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास मयत किशोर सोनवणे याने उधारीच्या कारणावरुन रुपेश सोनवणे यास शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यानंतर तो मित्रांसोबत नजीकच्या हॉटेल भानू येथे जेवण करण्यासाठी गेला होता. त्याच्या शिवीगाळ व मारहाणीचा रुपेश काकडे याला राग आला होता. त्यामुळे रुपेशने त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांना बोलावून घेतले. सर्वांनी किशोर याला हॉटेल भानू येथे जावून खुर्च्या, प्लॅस्टीक पाईप, लाकडी दांडके व धारदार शस्त्रांचा वापर करुन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यास मरण आले.
स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पो.स्टे. व शनिपेठ पोलिस स्टेशन अशी तिन पथके या गुन्ह्याच्या तपासकामी कार्यरत होती. या पथकाने केलेल्या तपासात रुपेश सुभाष काकडे, रुपेश मनोहर सोनार, प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाळे, ईश्वर उर्फ दुर्लभ नथ्थु सपकाळे, मयूर विनोद कोळी, प्रशांत सुभाष काकडे, ईश्वर सुभाष काकडे आदींना ताब्यात घेत अटक केली. या सर्वांना 25 मे पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सपोनि विठ्ठल पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश वाघमारे, गणेश चौबे, स.फौ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, विजय पाटील, युनुस शेख, सुनिल दामोदरे, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, किरण चौधरी, लक्ष्मण पाटील, सुचिन महाजन, भगवान पाटील, रफीक शेख, शियदास नाईक, हरीष परदेशी, हेमत पाटील, रणजीत जाधव, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमोल विसपुते, अश्विन हडपे, राहुल पाटील, राहुल घेटे आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.