५० लाखाची फसवणूक – व्यापाऱ्यास अटक

On: September 1, 2020 7:11 AM

औरंगाबाद – देशी, विदेशी दारु दुकानाचा परवाना काढून देण्याचे आमिष दाखवत जवळपास पन्नास लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी फरार व्यापाऱ्यास सिडको पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. हा व्यापारी एक वर्षापासून फरार होता. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
दयानंद वजलू वनंजे (४८) अकलूज, ता. बिलोली, नांदेड असे अटकेतील आरोपी व्यापा-याचे नाव आहे. राजकीय पदाधिकारी विलास चव्हाण यांच्या तक्रारीनुसार गतवर्षी सिडको पोलिस स्टेशनला दयानंद वनंजेसह अन्य आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता.

फरार दयानंद वनंजे हा दिल्लीत सोन्या चांदीचे दुकान चालवत असल्याची माहिती पो. नि. अशोक गिरी यांना मिळाली होती.त्यांनी आपल्या पथकाला दिल्ली येथे रवाना केले होते. या पथकाने त्याचा कसून शोध घेतला. चेह-याला मास्क लावलेला संशयित आरोपी रिक्षातून उतरत असल्याचे दिसताच पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला नजिकच्या पटेल नगर पोलिस स्टेशनला नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या अटकेची नोंद घेण्यात आली. न्यायालयाकडुन आरोपीस औरंगाबादला आणण्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर त्याला औरंगाबादला आणले गेले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment