भुसावळला गोळीबार – दोघे ठार

On: May 30, 2024 7:36 AM

जळगाव : रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली असून त्यात दोघे ठार झाले आहेत. भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा वैद्यकीय उपचारा दरम्यान या घटनेत मृत्यू झाला आहे. जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात ही घटना घडली. 

ठार झालेले दोघे जण चारचाकीने राष्ट्रीय महामार्गाकडून जुना सातारा मार्गे शहरात येत होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना लागलीच ट्रॉमा केअर सेंटरमधे दाखल आणि नंतर पुढील उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. पोलिसांनी घटनास्थळी तसेच दवाखान्यात धाव घेत बंदोबस्त राखला. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment