एमपीडीए कायद्याअंतर्गत तिघे स्थानबद्ध

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून तिघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. रामानंद, एमआयडीसी आणि अमळनेर अशा तिन पोलिस स्टेशनचा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावास जिल्हाधिका-यांची मान्यता मिळाल्यानंतर या कारवाईला मुर्त स्वरुप मिळाले आहे.

रामानंदनगर पो. स्टे. हदीतील अशोक बाळू कोळी (रा.साईबाबा मंदिराजवळ समतानगर, जळगाव) याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर  पोलिस स्टेशनला दारुबंदी कायद्याअंतर्गत 9 गुन्हे दाखल आहेत. रामानंदनगर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता.

अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील शिवम ऊर्फ दाऊद शुभम मनोज देशमुख (रा. पिंपळे रोड संविधान चौक लाकडी वखारीचे मागे अमळनेर) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यातआली आहे. त्याच्याविरुद्ध एकुण 27 गुन्हे दाखल आहेत. पो.नि. विकास देवरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याच्याविरुद्धचा प्रस्ताव तयार केला होता. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील भुषण उर्फ भासा विजय माळी (रा. भुई काटयाच्या मागे तुकाराम वाडी जळगाव) याच्याविरुद्ध एकुण 13 गुन्हे दाखल असून त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here