पोस्को प्रकरणातील संशयीत आरोपी देवयानी गोविंदवार यांचा कार्यक्रम आयोजकांनी केला रद्द!!  — क्राईम दुनिया बातमीचा इफेक्ट

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क)– एरंडोल तालुक्यातील खडके बालगृहातील बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयीत आरोपी देवयानी मनोज गोविंदवार यांचा रविवार 2 जून रोजी एका इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्थेत होणारा पालक – संवाद कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला आहे. कथित पालक प्रशिक्षक देवयानी मनोज गोविंदवार या शाळेतील मुलांच्या समस्या सोडवण्याचे रहस्य पालकांना सांगणार होत्या. हा पालक संवाद कार्यक्रम अगोदर शनिवार, 1 जून रोजी सकाळी होणार होता. मात्र काही कारणास्तव तो रविवार 2 जून रोजी ठेवण्यात आला. मात्र अखेरच्या क्षणी तो प्रस्तावित कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे.

एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात कथित पालक समुपदेशक देवयानी मनोज गोविंदवार यांना संशयीत आरोपी करण्यात आले आहे. हा खटला पोक्सो अंतर्गत जिल्हा न्यायालयात सुरु आहे. या खटल्याची पुढील तारीख 11 जून असून, 28 मे रोजी जिल्हा न्यायालयात झालेल्या कामकाजात देवयानी मनोज गोविंदवार व अन्य आरोपी प्रभाकर पाटील, विद्या रवींद्र बोरनारे, संदीप निंबाजी पाटील यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

या सर्व माहितीचा लेखाजोखा सर्वप्रथम “क्राईम दुनिया” ने संशयित आरोपी देवयानी मनोज गोविंदवार यांच्या फोटोसह प्रसिद्ध केली होती. गुन्हेगारी जगतातील क्राईम दुनियाची हीच बातमी संबंधित शाळेच्या संचालक मंडळापर्यंत वेळेवर पोहोचली. कथित पालक समुपदेशक देवयानी गोविंदवार यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल असल्याची आणि न्यायालयातून त्यांना समन्स बजावण्यात आल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांनी संस्था चालकांनी देवयानी मनोज गोविंदवार यांचा कार्यक्रमच रद्द केला आणि होणा-या पुढील बदनामीपासून आपला बचाव केला.

यापूर्वी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या एका कार्यक्रमात देवयानी मनोज गोविंदवार यांनी पाहुणचार घेत वक्तेपदाची भुमिका पार पाडली होती. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना देवयानी गोविंदवार यांच्या बाबतीत असलेला खरा  प्रकार कळला. देवयानी गोविंदवार या पोक्सो प्रकरणातील संशयीत आरोपी असल्याचे समजताच त्यांनी आपली चूक मान्य केली. आपली होणारी बदनामी टाळण्यासाठी बालसुधारगृहातील बालिकांच्या अत्याचार प्रकरणातील कथित संशयीत आरोपी देवयानी मॅडम यांचा होणारा कार्यक्रम संबधित इंग्रजी माध्यमाच्या संस्था चालकांनी रद्द केला आहे. त्यामुळे मुलांसह पालकांमध्ये होणारी शाळेची प्रतिमा मलीन होण्यापासून वाचली असून चुकीचा संदेश देखील थांबला.

देवयानी मनोज गोविंदवार, विद्या रविंद्र बोरनारे, संदीप निंबाजी पाटील यांच्यावर एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्टुडंट संघटनेचे अ‍ॅड. दीपक सपकाळे व सदस्यांनी केलेल्या आमरण उपोषणाने तसेच सामाजीक तथा आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीसह पाठपुराव्याने जिल्हा महिला समिती बरखास्त करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here