मुंबईत भरधाव कारने ८ जण चिरडले

On: September 1, 2020 10:44 AM

मुंबई : मुंबईच्या पायधुनी स्टेशन हद्दीत एका भरधाव कारने आठ जणांना चिरडल्याची अंगावर काटे आणणारी घटना रात्री नऊ वाजता घडली. या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले तर इतर चौघांवर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता हॉटेल नजीक ही दुर्दैवी घटना घडली. मारुती सुझुकी ईस्टीम या वाहनावरील चालकाने दिलेल्या धडकेत तिन महिला व एक पुरुषाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी उपचार घेत आहेत. घटनास्थळावरुन कार चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment