जळगाव : गोवंशांची कत्तल करुन त्यांचे मांस विक्री करणाऱ्या तिघांसह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघांकडे चोरीचे सहा बैल देखील आढळून आले आहेत. मुजाहिद मोहम्म्द जाबीर, शेख अनवर शेख शब्बीर कुरेशी आणि नेहाल खान नुरखान कुरेशी (सर्व रा. मासुमवाडी डायमंड हॉलच्या मागे जळगांव) अशी तिघांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, पोउनि राजेंद्र उगले, पोउनि विश्वास बोरसे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोहेकाँ सचिन मुंढे, गणेश ठाकरे, किरण पाटील, छगन तायडे, संजीव मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत 1 लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायमूर्ती श्रीमती एम. एम. बडे यांच्या न्यायालयात तिघा आरोपींना हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.