चोरीच्या तीन मोटार सायकलीसह दोघे चोरटे ताब्यात

On: June 10, 2024 9:21 PM

जळगाव : चोरीच्या तीन मोटरसायकली दोघा चोरट्यांकडून भडगाव पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. भडगाव पोलीस स्टेशनला दाखल दोन आणि जळगाव रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अमोल तुकाराम पाटील (रा. भडगाव पेठ, भडगाव, ह.मु. आदर्शनगर, चाळीसगांव रोड, भडगाव) आणि अमोल भागचंद परदेशी (रा. आझाद चौक, भडगाव ह.मु. भोसले पार्क, कोठली रोड, भडगाव) अशी अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेका किरण रविंद्र पाटील, पोहेकौं निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोकाँ सुनिल जयसिंग राजपुत, पोकौं प्रविण परदेशी, पोकाँ संभाजी पाटील यांनी या तपासात सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किरण पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment