बालिकेच्या अपहरणासह खूनाने खळबळ

On: June 13, 2024 8:00 AM

जळगाव : सहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करुन केळीच्या बागेत तिचा खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.  मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. या घटनेप्रकरणी सुभाष उमाजी भिल या संशयीत तरुणाविरुद्ध अपहरणासह खूनाचा गुन्हा जामनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

मंगळवार 11 जूनच्या दुपारी या बालिकेचे आई – वडील शेतात मजुरीसाठी गेले होते. त्यावेळी ही बालिका काही बालकांसोबत नजीकच्या ओट्यावर होती. दरम्यानच्या कालावधीत संशयीत सुभाष भिल या तरुणाने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत दुकानाकडे नेले.

सायंकाळी बालिकेचे आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांना बालिका दिसली नाही. त्यांनी तिचा बराचवेळ शोध घेतला. मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर त्यांनी जामनेर पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत पोलिसांना कथन केली. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ गाव गाठले. बालिकेचा शोध  घेतला असता तिचा केळीच्या बागेत मृतदेहच आढळून आला. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment