तलवारीच्या धाकावर दहशत माजवणाऱ्यास अटक

On: June 13, 2024 12:48 PM

जळगाव : तलवारीच्या धाकावर दहशत माजवणा-या तरुणास  एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. फैजल शेख कदीर (रा. मास्टर कॉलनी मेहरुण – जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फैजल शेख कदीर हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन तांबापुरा परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून फैजल यास ताब्यात घेत पुढील कारवाई केली. 12 जून रोजी त्याच्या कब्जातील तलवार हस्तगत करण्यात आली. 

पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोना विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, चंद्रकात पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment