उद्यापासून रेल्वे प्रवासाची बुकींग होणार सुरु

On: September 1, 2020 7:29 PM

मुंबई : राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता रेल्वेने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी मध्य रेल्वेने 2 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु केली आहे. लॉकडाऊनपासून रेल्वे प्रवास बंद करण्यात आला होता. त्यानंतर विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यत आली होती.केंद्र सरकारने ई पासची अट काढून टाकली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील ई पास रद्द केला आहे. प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात अर्थात आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे.

मध्य रेल्वेनेही याबाबत आता निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने एक पत्रक काढत आरक्षण पद्धतीने 2 सप्टेबर पासून रेल्वेसेवा सुरु केली जाणार (Central Railway booking Start) असल्याचे त्यात म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वेमधून हा प्रवास करता येईल. प्रवासी रेल्वेच्या प्रवासाची तिकिटे रेल्वे स्थानकांवरून आरक्षित करु शकतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment