जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघे अट्टल चोरटे जेरबंद 

On: June 16, 2024 7:34 PM

जळगाव : पोलीस दलाच्या अभिलेख्यावरील तिघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वैभव विजय सपकाळे, कल्पेश निलेश इंगळे, दिपक धनराज सपकाळे अशी आसोदा ता. जळगाव येथील राहणाऱ्या अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत. तिघांच्या अटकेने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. 

दि. 14 जून 2024 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अटकेतील तिघांनी संगनमताने शस्त्राचा धाक दाखवून आसोदा येथे एकाच्या शर्टाच्या खिशातून बळजबरीने रोख रक्कम लुटून पलायन केले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल झाला होता. 

या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान तिघांना आसोदा शिवारातून शिताफिने अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील हे. कॉ. राजेश मेढे, हे. कॉ. जितेंद्र पाटील, पो. कॉ. बबन पाटील, चालक हे. कॉ. भारत पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासणी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment