राष्ट्रीय महामार्ग फर्दापुर ते जळगाव चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील  क्र. ७५३   एफ  डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया  पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला  असुन सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.
 त्यामुळे सदर पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असुन या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे व जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार दि. १६ जून, २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होई पर्यंत बंद करण्यात येत आहे. 

पर्यायी बदल पुढीलप्रमाणे : पर्याय क्र. ०१- जड वाहतुक – नेरी एरंडोल- चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर
पर्याय क्र. ०२ – हलकी वाहतुक – फर्दापुर – तोंडापुर – मांडवा – वाकडी- शहापुर- जामनेर – नेरी. असा बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here