पोलीस पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याची पत्नीची तक्रार

On: June 19, 2024 7:26 AM

जळगाव : मद्याच्या नशेत पोलिस पतीने मारहाणीसह अनैसर्गिक कृत्य केले तसेच सासू व नणंदेने पाच लाख रुपये माहेरुन आणावे म्हणून छळ केल्याची विवाहितेने पोलिसात तक्रार केली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलीस पतीसह सासु व नणंद अशा तिघांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस पतीने मद्यपानासह मौजमजा करण्यासाठी आपले दागिने नेऊन पैसे खर्च केल्याचा विवाहितेचा आरोप आहे. ऑक्टोबर 2023 ते 17 जून 2024 या कालावधीत हा प्रकार वेळोवेळी सुरु होता असे विवाहितेचे म्हणणे आहे. पाच लाख रुपये माहेरुन आणावे यासाठी सासू व नणंद यांनी आपला छळ केला असाही विवाहितेचा आरोप आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment